गोडोलीत 29 हजाराची चोरी
सातारा : सातारा शहरातील गोडोली येथील बंद घरातील 29 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस चौकीला नोंद झाली आहे.

गोडोली येथील कोयना सन्मित्र सोसायटीत असलेले बंद घर चोरट्यांनी फोडले आहे. तक्रारदार हे कामानिमीत्त पुणे येथे राहण्यास आहेत. ते दि. 18 फेब्रुवारीला घर बंद करून पुण्याला गेले होते. त्यानंतर ते दि. 4 ऑगष्ट रोजी साताऱ्यात परत आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घराच्या खिडकीचा गज कापुन 29 हजार रुपयाचे एलसीडी व इतर साहीत्य चोरल्याची तक्रार अनिल आत्माराम खेर रा. कोयना सन्मित्र सोसायटी, गोडोली यांनी दिली आहे. दाखल चोरीचा तपास पोलिस करत आहेत.

No comments

Powered by Blogger.