महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम


कोरेगाव : भाजपचे कोरेगाव- खटाव विधानसभा मतदार संघाचे नेते महेश शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार. दि. 8 रोजी कोरेगाव शहरात कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरेगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रबोधिनी अंध विद्यालय आणि एहसास मतिमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप करण्यात येणार आहे. त्रिपुटी ग्रामस्थांच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. सातारा जिल्हा भाजप युवामोर्चा सरचिटणीस रमेश उबाळे यांच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. भाजप व संदीपभाऊ शिंदे मित्र समूह यांच्यातर्फे एसटी पिकअप शेडचे भूमिपूजन, भाजप माहुली यांच्या वतीने जि. प. शाळा माहुली व माजी सदस्य संदीप शिंदे आणि सुनील सावंत यांच्या वतीने जि. प. शाळा जिहे येथे वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. 

तासगाव येथे जि. प. सदस्य रेशमताई शिंदे यांच्या फंडातून तासगाव आणि चिंचणेर येथे बंदिस्त गटार योजना व रस्त्याचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता महेश शिंदे कोरेगाव येथील शिवरत्न मंगल कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. कोरेगाव-खटाव विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.