ग्रामस्थांची साथ मिळाल्यास विकासकामांना वेग : लिना देशपांडे


रहिमतपूर  : आम्ही समाजाचे काही देणं लागतो, ही भावना जोपासत कल्याणी उद्योग समुहाच्या माध्यमातून शंभर गावांमध्ये प्रगतीच्या दृष्टीने विकासकामे करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रामस्थांची साथ मिळाल्यास विकासकामांना वेग येणार आहे, असे प्रतिपादन भारत फोर्स कंपनीच्या व्हा. चेअरमन लिना देशपांडे यांनी केले.

तारगाव, ता. कोरेगांव येथे कल्याणी ग्रुपच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कल्याणी ग्रुप सदस्या प्रतिभाताई कल्याणी, जयदीप लाड, धामणेरचे सरपंच शहाजी क्षीरसागर, नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले उपस्थित होते.

देशपांडे म्हणाल्या, कल्याणी ग्रुप व भारत फोर्स कंपनी ग्रामीण भागात पाणी उपलब्धता, कौटुंबिक उत्पन्न वाढ, आरोग्य, शिक्षण, तरूणांसाठी कौशल्य विकास या पंचसूत्रीच्या आधारे ग्राम विकासाला चालना देत आहे. ग्रामस्थांच्या सहभागाचीही याला साथ मिळावी.

शहाजी क्षिरसागर, सह्याद्रीचे संचालक कांतीलाल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप मोरे यांनी प्रास्ताविक केले. दिलीपराव मोरे यांनी आभार मानले. पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब निकम, सरपंच सुलभा तावरे, उपसरपंच सुनिता निकम, ग्रामसेवक आढाव, सदस्या मनिषा निकम, सुनिता पाटील, दिलीप देशमुख, अशोक तावरे, हिंदुराव निकम, अभिजीत घोरपडे, भरत निकम , प्रशांत निकम, राजेंद्र मोरे, दादासो थोरात, मुन्ना मुलाणी, सुरेश थोरात, रत्नाकर शेटे, उत्तमराव मोरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.