शिवथर येथील तो अपघात नसुन घातपात
सातारा : लोणंद सातारा रस्त्यावरील दि. ३१ रोजीचा तो अपघात नसुन अनैतीक संबधावरुन झालेला खुन असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. सातारा-लोणंद रस्त्यावर मंगळवार दि. ३१ रोजी मध्यरात्री अमित भोसले रा. आरबवाडी ता. कोरेगाव हा साताऱ्यावरून लोणंदच्या दिशेने दुचाकीवर (एमएच 12 एफ 1996 ) जात होता.
यावेळी शिवथर गावाजवळ रस्त्यामधील खड्ड्यात गाडी आदळुन अमित भोसलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली होती.
मात्र या प्रकरणात पहिल्यापासुनच पोलिसांना घातपाताची शंका होती. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत मयताचे फोन डिटेल्स पोलिसांनी काढले होते. यावरुन पोलिसांनी शनिवारी रात्री योगेश भिलारे या युवकाला ताब्यात घेतले आहे.
त्याच्याकडे चौकशी केली असता अनैतीक संबंधाच्या संशयावरुन अमितचा काटा काढल्याची कबुली त्याने दिली आहे. दरम्यान याप्रकरणात एका महिलेची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. प्रदीप जाधव करत आहेत.
Post a Comment