Your Own Digital Platform

बहीण भावाच्या नात्याला सोन्या चांदीची झळाळी


सातारा : राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन. बहिण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस मोठ्या आनंदात सर्वत्र साजरा केला जातो. बहिण भावाच्या नात्याला या वर्षी सोन्याचांदीचे झळाळी मिळत आहे. साताराच्या बाजारपेठेत सोने व चांदीच्या राख्या खरेदीसाठी बहिण भावाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत आहे. 22 कॅरेट सोनेच्या अडीच हजार ते सहा हजारापर्यंत तर 92 कॅरेट चांदीच्या अडीचशे रुपयापासून ते दोन हजार रुपायापर्यंत आकर्षक पद्धतीत राख्या उपलब्ध आहेत. हळदी कुंकू, खोबरे, गंगाजल, खडीसाखर,तांदूळ व राखी असा सेट तयार असलेल्या राख्या विक्री करत असल्याची माहिती म्हसवडकर सराफ प्रा. लि.चे श्रेणिक शहा यांनी प्रभातला दिली.

आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन व जबाबदारी भाऊ स्वीकारतो त्याची जाणीव म्हणून बहिण त्याला राखी बांधते. साताऱ्यात या वर्षी सोन्या चांदीच्या राख्यासोबत इतर राख्या बाजारपेठेत उपलबध्द आहेत. यामध्ये, कुंदन, खड्याची, विविध प्रकारच्या मण्याची, चंदनाची सेंटेड राखी, स्पिनर, तुळशी माळ, रुद्राक्ष, व लहान मुलांना आवडणाऱ्या लायटिंग तसेच कार्टूनच्या छोटा भीम, मोटु पतलू. याची लहान मुलांमध्ये क्रेज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रख्याच्या किमतीत वाढ झाली आहे. राख्यावर जीएसटी लागू नसला तरी बाजारपेठेत रख्याच्या किमती वाढ झाली असली तरी खरेदीसाठी बाजारपेठेत स्टॉल वर खरेदीकरिता गर्दी होत असल्याचे विक्रेत्यानी सांगितले. पुणे, मुंबई वरून होलसेल दराने राख्या विक्रीकरिता आणल्या जातात. या वर्षी सातारा शहरात मोठ्या प्रमाणात राख्याचे स्टॉल लागले असल्याने दरवर्षी राख्याचे स्टॉल लावणाऱ्यांना नित्य वर्षी प्रमाणे राख्याच्या स्टॉल मधून मिळणारा आर्थिक लाभ कमी होत असल्याचे विक्रेत्यानी सांगितले. तसेच बाहेरगावी असलेल्या भावापर्यंत बहिणींना राख्या सुरक्षितरित्या पोहचवण्यासाठी जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयात राख्या खरेदी करून गर्दी झाल्याचे दिसत आहे.