म्हसवड पोलिसांची रोडरोमियोंवर कारवाई


म्हसवड  : म्हसवडमध्ये 16 रोडरोमियोंवर पोलिसांनी कारवाई केली. शहरात भरधाव दुचाकीवरून सुसाट येणारे रोडरोमियो शाळकरी मुलींना कट मारून जाणे, छेडछाड करणे असे उद्योग करत होते. याबाबत दै. प्रभातमधून आवाज उठवण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत म्हसवड पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली.

म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी 12 ते 2 दरम्यान सातारा-पंढरपूर रोडवर प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या मध्यभागी येण्या जाण्याच्या रस्त्यावर ट्रिपल सिट बसून दुचाकी जोरात चालवणे, सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून शांततेचा भंग करणे, शाळकरी मुलीची टिंगल टवाळकी करणे असे उद्योग रोडरोमियो करत होते. यामुळे मुलींसह पालकवर्ग त्रस्त होते. याबाबत दै. प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत सोमवारी पोलिसांनी 16 रोडरोमियोंवर कारवाई करत केली. सिध्दनाथ हायस्कुलसमोर, चांदणी चौक, बसस्थानक चौक आदी परिसरातून प्रविण केवटे, सुरज भोंडवे, तेजस करमाळकर, सुदाम जाधव, नागेश लोखंडे, आकाश माने, न्यानेश्वर माने, सिध्दार्थ माने, अभिजित माने, समाधान चव्हाण, सौरभ बोडरे, सागर माने, संतोष काटकर, राजू जाधव, अजय जाधव आदी रोडरोमियोंवर दंडात्मक कारवाई झाली.

यापैकी दहाजणांवर मोटार वाहन अधिनियमनाद्वारेही कारवाई करण्यात आली आहे. सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस संतोष बागल, सुरज काकडे तसेच प्रदिप जाधव आदींनी कारवाई केली.

दरम्यान, शहराच्या मेनरोड, कासारबोळ, शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक, सिध्दनाथ मंदिर, खडकी आदी रस्त्यांवर रोडरोमियोंची जास्त वर्दळ असते. याठिकाणी पोलिसांनी संशयीत युवकांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.