Your Own Digital Platform

मुलांनी मोबाईलचा वापर टाळावा


कोळकी : मुलांनी अभ्यासात ,खेळात रमून जावे मोबाईल चा वापर टाळावा, समाजातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे. तुम्हाला जर एखाद्याने त्रास दिला तर त्या साठी कायदा आहे, त्रासदायक घटना घडल्यास पालकांना निश्चित सांगा असे प्रतिपादन सह दिवाणी न्यायाधीश एस. एम. बोहरा यांनी केले.

फलटण तालुका विधी सेवा समिती फलटण व फलटण वकिल संघ फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. सदगुरु प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये आयोजित कायदेविषयक शिबिरामध्ये श्री. बोहरा बोलत होते. या प्रसंगी दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील, श्री सदगुरु प्रतिष्ठान च्या संचालिका ऍड सौ. मधुबाला भोसले, ब्रिलियंट अकॅडमी चे सचिव रणजितसिंह भोसले, वकिल संघाचे अद्यक्ष पी. पी. जाधव ,विधिज्ञ व्ही. व्ही. फरांदे, विधिज्ञा सौ. पी. डी. निंबाळकर, वकिल संघाचे उपाध्यक्ष ए. सी. पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

के. के.पाटील म्हणाल्या,18 वर्षाखालील मुले जी गुन्हेगार ठरतात त्यांना 3 वर्षे सुधारणा गृहात ठेवले जाते, या वयात विविध गोष्टींचे आकर्षण असते त्यामुळे अशी मुले गुन्हेगारीकडे वळतात.त्यासाठी चांगले मित्र मैत्रिणी बनवा.वाईट संगतीने अपराध घडतात त्याचा भावी आयुष्यावर परिणाम होतो.

सौ. पी .डी. निंबाळकर म्हणाल्या, अन्याय झाल्यावर त्याच्या विरोधात आवाज उठवा. पीडित मुलाचे नाव गुपीत ठेवले जाते.न्यालायचे कामकाज जलद गतीने चालते.असे सांगून सौ. निंबाळकर यांनी बाल लैंगिक शोषणा विरुद्धचा कायद्या विषयीची माहिती दिली.श्री. फरांदे यांनी मनोधैर्य योजनेविषयीची माहिती दिली.

सौ. भोसले म्हणाल्या, कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे तसेच कायद्याविषयक ज्ञान हि आवश्यक आहे.पी. पी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. सौ. मधुबाला भोसले यांनी स्वागत केलेव वकील संघाच्या पदाधिकारी यांचा सत्कार श्री. सदगुरु प्रतिष्ठान वतीने करण्यात आला. सौ. स्मिता शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.डी. जे. शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास ब्रिलियंट अकॅडमी चे प्रिन्सिपल विश्वास केसकर, हणमंतराव पवार हायस्कुलचे प्राचार्य राजेंद्र रेपाळ,
 वकिल संघाचे सदस्य, विध्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.