एसटी कॉलनीत स्वच्छता मोहीम


सातारा : सातारा येथील एसटी कॉलनीतील पाण्याची समस्या तसेच कचऱ्याचे साम्राज्य असल्याने रहिवाशी त्रस्त होते. याबाबत दै. प्रभातमधून आवाज उठवल्यानंतर सातारा पालिका प्रशासनाने दखल घेत एसटी कॉलनी परिसरात स्वच्छता मोहिम राबवली. दरम्यान, पाण्याची समस्या अजूनही जैसे थे असून एसटी प्रशासनाने आता उदासिनता सोडून हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी एसटीतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

सातारा बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. याठिकाणी सुमारे 48 सदानिका आहे. याठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रतिमहिना 472 रुपये मेन्टेनन्ससाठी कापून घेतले जातात. तरीही मुलभूत सुविधांचाही वानवा आहे. याबाबत दै. प्रभातमधून आवाज उठवण्यात आला होता. यानंतर पालिका प्रशासनाने दखल घेत एसटी कॉलनी परिसरात साफसफाई केली. परंतु, पाण्याची समस्या अजूनही जैसे थे आहे. याठिकाणी नळजोडणीतील तांत्रिक टंचाईमुळे पाणी पुरवठा चार दिवसांतून एकदा होत आहे. त्याची तातडीने दुुरुस्ती करून रहिवाशांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.