Your Own Digital Platform

राजुरी येथे कृषी कन्यांचे जनावरांना लसीकरण शिबीर संपन्न


राजुरी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्या यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत राजुरी येथे जनावरांना लसीकरण करण्यात आले.

या मध्ये जनावरांना घटसर्प व फ-या रोगावरील ब्लॅक काॅर्टर ही लस टोचण्यात आली. या शिबिरा वेळी फलटण तालुका सहकारी दुध संघाचे चेअरमन धनंजय पवार, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, राजुरी गावच्या सरपंच सौ. कौशल्या साळुंखे, उपसरपंच पै. भारत गावडे, बरड चे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. नाझीरकर, पशुधन विकास अधिकारी डाॅ. बेंद्रे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

प्राचार्य एस. बी. शिंदे, प्रा. जी. एस. शिंदे व प्रा. आर. व्ही. कर्चे , समन्वयक एस. एस. आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना जनावरांच्या विविध आजारांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच जनावरांची शेतकऱ्यांनी काळजी कशी घ्यावी, विविध औषधे व घरगुती उपाय या विषयी माहिती दिली. यावेळी कृषी कन्या शामल अभंग, ऐश्वर्या देशमुख, अंकिता शिवथरे, प्राज्कता भोईटे, मोनिका शिंदे, सुनिता ठोंबरे, प्रिया इनामके यावेळी उपस्थित होत्या.