आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

लक्ष्मी टेकडीतल्या घरांची दैना……पण लक्षात कोणी घेईना
सातारा : खा. उदयनराजे भोसले यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक साडे तीन लाखांच्या विक्रमी मताधिक्‍याने जिंकली होती. त्यावेळी त्यांच्या जाहिरनाम्यात म्हाडाच्या 1473 घरकुल योजनेचा महत्वकांक्षी प्रक ल्प होता. 

उदयनराजेंनी झोपडपट्टी मुक्‍त सातारा जे स्वप्न पाहिले होते, त्याला सरकारी बाबूगिरीमुळे हरताळ फासला गेला 
आहे. सदर बझारमधील बीव्हीजीने बांधलेल्या निकृष्ट घरकुल योजनेचा बोजवारा उडाल्यानंतर लक्ष्मी टेकडीतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. घरांचे तुटलेले दरवाजे, गळक्‍या भिंती, शौंचालयांची निकृष्ट ड्रेनेज व्यवस्था यामुळे येथील घरकुलांमध्ये नरक यातना भोगण्याची वेळ आली आहे. 

असा संताप लाभार्थी व्यक्‍त करत आहेत. या योजनेतील बरीच घरकुले अपुर्ण असल्याचा आरोप करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी नगरपालिकेच्या नव्या प्रवेशद्वारासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाची गडबड उडाली. बीव्हीजीसारख्या देशपातळीवरची स्वच्छता व्यवस्था सांभाळणाऱ्या नामांकित ठेकेदार कंपनीकडून साताऱ्यात मात्र बांधकामाचे तीन-तेरा वाजले आहेत. खा. उदयनराजे यांनी साताऱ्यासाठी झोपडपट्टी मुक्‍त सातारा हे अभियान जाहिर करून या घरकुल योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी चक्‍क राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. तरी देखील या झोपडपट्टीत राहणाऱ्यांची स्वप्ने अजुनही अधुरीच आहेत.