Your Own Digital Platform

इंटरनॅशनल स्पर्धेत लोणंदचा मयंक देशांत पहिला
लोणंद : इंटरनॅशनल ऍबॅकस स्पर्धेत देशात प्रथम येण्याचा मान लोणंद येथील मयंक दोशी याने मिळविला. मयंकच्या या यशाने लोणंदनगरीच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या लौकीकात भर पडली आहे. मयंकने या परीक्षेत तीन मिनिटात 75 पैकी 65 प्रश्‍नांची बरोबर उत्तरे सोडवून बाजी मारली आहे.

मॅथस्‌ इंडिया प्रा. लिमिटेडच्यावतीने आयोजित इंटरनॅशनल ऑनलाईन ऍबॅकस परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत लोणंदच्या मयंक दोशीनेही सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी देशभरातून एकूण 14 हजार मुली सहभागी झाली होती. स्पर्धेसाठी असलेल्या 75 प्रश्‍नांपैकी 65 प्रश्‍नांची बरोबर उत्तरे तीही केवळ तीन मिनिटातच सोडवून मयंक दोशीन देशभरातून आलेल्या 14 हजार मुलांमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
मयंकने या परीक्षेत एकूण 300 पैकी 244 गुण मिळविले आहेत. मयंकच्या या उत्तुंग यशाबद्दल लोणंदच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे. तसेच यापुढेही असेच यश संपादन करून लोणंदचे नाव देशात उज्ज्वल करावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्याच्या यशाचे कौतुक कुटुंबिय तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि मित्र परिवाराने केले.