आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

स्व.अटलबिहारी वाजपेयींचा अस्थिकलश गुरूवारी जिल्ह्यात


सातारा :
भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीकलशाचे गुरूवार दि.23 ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. शिरवळ येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आणि दर्शनासाठी अस्थीकलश ठेवण्यात येणार आहे यानंतर शिरवळ – खंडाळा-सुरुर- भुईंज- पाचवड या ठिकाणी श्रद्धांजली आणि अस्थीकलश दर्शन होईल. दुपारी 1 ते 2 या कालावधीत राजवाडा चौक सातारा येथे श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्यासाठी अस्थीकलश ठेवण्यात येणार आहे.

यानंतर नागठाणे-उंब्रज-तासवडे(टोल नाका)-वहागाव- या ठिकाणी श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण केल्यानंतर अस्थीकलश इस्लामपूर मार्गे सांगलीकडे नेण्यात येणार आहे.यानंतर 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अस्थीकलश कराड येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्याकरिता ठेवण्यात येणार आहे. श्री.छ. शाहू चौक, श्री. छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ, चावडी चौक,आझाद चौक या मार्गावरून अस्थिकलश प्रीती संगम येथे श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्यासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 2 वाजता कृष्णां कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमामध्ये विसर्जन करण्यात येणार आहे.तरी सर्व नागरिकांनी वर नमूद केलेल्या ठिकाणी श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करण्याकरिता उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले आहे