कराडात सामुहिक मुंडणाने मराठा आंदोलकांचा निषेध


कराड : मराठा समाजाला आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने दिलेल्या आश्वासन वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असताना येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी मराठा आंदोलक युवकांनी सरकारविरोधी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सामुहिक मुंडण आंदोलन केले.

यावेळी आक्रमक आंदोलकांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतयं देत नाय घेतल्या शिवाय रहात नाय, सकल मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य तात्काळ मान्य कराव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर मराठा युवकांनी सामुहिक मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात सुमारे पंधरा ते वीस जण सहभागी झाले होते.

No comments

Powered by Blogger.