रिद्धी कदमचे शिष्यवत्ती परीक्षेत यश


गोंदवले : गोंदवले, ता. माण येथील त्रिंबकराव काळे विद्यालयातील कु. रिद्धी रुपेश कदम हिने पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले. याबद्दल तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गोंदवले येथील त्रिंबकराव काळे विद्यालयाची विद्यार्थिनी कु. रिद्धी कदम हिने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले. 

या यशाबद्दल शाळेच्या वतीने रिद्धी व तिचे पालक रुपेश कदम व प्रतिमा कदम यांचा प्राचार्य दोरगे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रिध्दीला मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

No comments

Powered by Blogger.