Your Own Digital Platform

शेततळी अस्तरीकरण ड्रॉ लवकर काढा :प्रा. विश्वंभर बाबर


म्हसवड : जिल्हा कृषी विभागा अंतर्गतच शेततळी अस्तरीकरणाचा ड्रॉ लवकरात लवकर काढा अशी मागणी पुणे विभागीय आयुक्तस्तर भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य प्रा. विश्वंभर बाबर यांनी केले आहे.

याबाबतचे मागणीपत्र प्रा. विश्वंभर बाबर यांनी जिल्हा अधीक्षक कृषीअधिकारी सातारा यांना दिले आहे. सध्या पावसाळा हंगाम असून उरमोडी कॅनॉलचे पाणी माण तालुक्याचे पळशी सह काही गावात सोडलेले आहे. 

उरमोडीप्रकल्पाचे पाणी अल्पवधीत पुन्हा कॅनॉलमधून सोडले जाणार आहे.यापाण्याचा उपयोग शेततळी भरण्यासाठी होणार आहे. माण तालुक्यात १००शेततळ्याचे काम पूर्ण झाले असून अस्तरीकरानासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव केलेले आहेत मात्र जिल्हा स्तरावरून
अद्याप ड्रॉ काढलेला नसल्याने शेतकर्यांना पूर्व सहमती पत्र मिळालेले नाही. काही ठिकाणी उपलब्धअसण्याऱ्या पाण्यातून शेततळे भरून घेण्याअगोदर मोजमापे व पूर्वसहमतीपत्र मिळाल्यास शेततळी पाण्याने भरून घेणे सोयीच्या होणार आहे.शेतकरी हिताचा विचार करता शेततळी अस्तरीकरण ड्रॉ लवकर काढावा अशी मागणी प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.