कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला


पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी धरणात येणा-या पाण्याची आवक कायम असल्याने बुधवारी पुन्हा कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेसहा फुटाने उचलण्यात आले आहेत.त्यामुळे कोयना नदी पात्रात धरणातुन 57 हजार 375 क्‍युसे व पायथा वीजगृहातुन 2100 असे 53385 क्‍युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात आज पावसाने काहीकाळ उघडीप दिली आहे.मात्र कोयना धरणात समुारे 35 हजार 121 क्‍युसेक पाणी प्रतिसेकंद येत आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी दुपारी 2 वाजता सहा वक्र दरवाजे पाच फुटाने वर उचलुन नदी पत्रात पायथा वीजगृहातुन 2100 व धरणातुन नदी पत्रात 51 हजार 285 असे 53 हजार 385 क्‍युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

आज रोजी धरणातील पाणीसाठा 103.08 टीएमसी आसुन पाणी पातळी 2161.10 फुट एवढी आहे. गेल्या चोवीस तासात कोयना 142 मिली मिटर नवजा 204 मिली मिटर महाबळेश्‍वर 163 मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान कोयना नदीवरील मुळगाव पुलावरून पाणी जात आहे.त्यामुळे नदी पलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे.

No comments

Powered by Blogger.