लॉजवर छापा टाकून तीन मुलींची सुटका


पुणे :  सामाजिक सुरक्षा विभागाने लॉजवर छापा टाकून तीन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. करण शर्मा, योगी उर्फ मॉन्टी पटेल, दिनेश आणि प्रशांत मच्छिंद्र पाटील यांच्याविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रशांत पाटीलला कारवाईच्या वेळी ताब्यात घेण्यात आले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना पोलीस नाईक सचिन कदम यांच्याकडून योगी उर्फ मॉन्टी पटेल हा वेगवेगळ्या लॉजेसमध्ये साथीदारांच्या मदतीने रुम बुक करून परराज्यातील मुलींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. तो हा सर्व प्रकार मोबाईल फोनच्या माध्यमातून करत होता. त्यानुसार सापळा रचून विमाननगर संजय पार्क येथील श्रीकृष्णा लॉजवर छापा टाकण्यात आला. 

यावेळी दोन सिक्कम व एक दिल्ली राज्यातील अशा तीन मुलींची सुटका करण्यात आली. कारवाईच्या वेळी रोख पाच हजार व तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. या पीडित मुलींची रेस्क्‍यु फाउंडेशन येथे रवानगी करण्यात आली. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.