परिवर्तन संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सायकल वाटप


पुसेगाव : 
मोळ-मांजरवाडी, ता. खटाव येथील काळंगे विद्यालयात पुणे येथील एस. बालन ग्रुप व परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सायकली भेट देण्यात आल्या.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, समुहाचे अध्यक्ष पुनित बालन,’ परिवर्तनचे विश्वस्त शेखर वाल्हेकर, सदस्या शुभांगी जाधव आदीच्या उपस्थितीत परिवर्तन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू विराज परदेशी यांच्या हस्ते काळगे विद्यालय, कोटेश्वर विदयालय गोवे, रा. वि. तारळकर हायस्कुल भाडळे आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय किन्हई या शाळांमधील विद्यार्थ्यांना सायकल, शालेय कीटचे वाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, प्रदीप लोखंडे यांना परिवर्तन सेवा तर परिवर्तन प्रेरणा पुरस्कार टॉयथलॉन खेळाडू विराज परदेश यांना प्रदान करण्यात आला. 

पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काळंगे, मुख्याध्यापक संजय गोडसे, संपतराव गायकवाड, उत्तमराव घाटगे, संभाजी कुंभार, भालेराव गुरुजी, उपसरपंच जातिंदर वाघ, गजानन वाघ, अरूण वाघ, विलासराव घाटगे, आदी उपस्थित होते. अशोक भोसले यांनी सुत्रसंचालन केले. दिलीप साबळे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.