Your Own Digital Platform

वेळी मायणीत आगीत घर खाक


ठोसेघर : जावली तालुक्‍यातील दुर्गम भागातील वेळे मायणी गावामधील सखाराम बापू पवार यांच्या घराला अचानक आग लागून घरासहित सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, सखाराम पवार यांच्या पत्नी सकाळी आठच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक घरातून धूर यायला लागला म्हणून त्या धावत घराकडे आल्या असता घराला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून आसपासच्या गावकऱ्यांना बोलावले. गावकऱ्यांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. 

परंतु आग नियंत्रणात आली नाही. सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, घरासहित सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले. आगीमध्ये सखाराम पवार यांचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पवार कुटुंबियांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.