‘एअरबॅग्ज’ उघडल्याने अपघातात दोघे बचावले


सातारा : कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या कारला साताऱ्याजवळील चाहूर येथे महामार्गावर अपघात झाला. अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांनी सीटबेल्ट लावला होता. त्यामुळे कारमधील “एअर बॅग्ज’ उघडल्या व कारमधील कोल्हापूरचे दोन प्रवासी बचावले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद रात्री उशीरा सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

कोल्हापूर येथील राहूल खार्गे हे आपल्या कारमधून (एमएच नऊ, ईके 3040) मधून आज दुपारी महत्वाच्या बैठकीसाठी पुण्याकडे निघाले होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार सातारा शहरानजिक आली. महामार्गावरील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील चाहूर फाटा येथे उड्डाणूल उतरुन मोटार खाली जात होती. त्याचवेळी महामार्गावर अचानक एक गाडी भरधाव कारच्या आडवी आली. 

त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक लावला पण सुरवातीला ब्रेक लागला नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केल्यावर कारचे ब्रेक लागले. पण त्यामुळे गाडी स्लीप होऊन महामार्गाशेजारील दुभाजकावर आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नाही. सर्वांनी सीट बेल्ट लावले असल्याने तसेच अपघाताचा जोरदार धक्का बसल्यानंतर मोटारीमधील “एअरबॅग्ज’ उघडल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.

No comments

Powered by Blogger.