साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग; तिघांवर गुन्हा


सातारा: सातारा परिसरातील एका दहावीतील शाळकरी मुलीची तिघेजण वारंवार छेड काढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितामध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश असून चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.करण भिसे, निलेश साळवेकर व अल्पवयीन एक (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) असा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित तिघेजण शाळकरी मुलीला गेल्या एक वर्षापासून त्रास देत आहेत. वारंवार पाठलाग करणे, दमदाटी करणे असे प्रकार सुरू असतानाच एकदा धारदार चाकूचा धाक दाखवून विनयभंगही केला. अखेर पीडित मुलीने घडत असलेल्या घटनेबाबत आईला सांगितले. त्यानुसार मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

No comments

Powered by Blogger.