माणच्या तहसीलदारपदी बी.एस. माने


पळशी : माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांची पूणे येथे भुसंपादन अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर या पदासाठी मर्जीतला तहसीलदार येण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय लॉबिंग झाले होते. या पदावर बी.एस. माने यांची वर्णी लागली आहे. माणच्या तत्कालीन तहसीलदार सुरेखा माने यांना 11 मे रोजी उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. 

तेव्हापासून माणला पूर्णवेळ तहसीलदार मिळाला नाही. या पदासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय लॉबिंग झाल्याची चर्चा आहे. माळशिरसच्या तहसीलदार बी.एस. माने यांना आणण्यासाठी माणच्या भाजपा नेते मंडळीनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे साकडे घातले होते तर काँग्रेसच्या गटाने जतचे तहसीलदार अभिजीत पाटील यांना आणण्यासाठी ना. सदाभाऊ खोत यांच्याकडे साकडे घातले होते. या रेस मध्ये भाजपने सरशी मारली दादांनीही मानेंचेच नाव फायनल केलं आहे. दोन महिन्यांपासून माण तालुक्यात तहसीलदार कोण येणार? याची उत्सुकता लागली होती. या चर्चेला बी. एस. माने यांची वर्णी लागल्याने पूर्णविराम मिळाला आहे.

No comments

Powered by Blogger.