Your Own Digital Platform

सदगुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी


कोळकी : श्री. सदगुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जीवनपट भाषणाद्वारे सादर केला. चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.अध्यक्ष स्थानी सुरज सरक हा विद्यार्थी होता

यावेळी हणमंतराव पवार हायस्कुलचे प्राचार्य राजेंद्र रेपाळ, आनंदवन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका स्वाती फुले उपस्थित होते.प्रदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.कार्यक्रमास विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते.