म्हसवडच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
यावेळी बनगर म्हणाले, सद्या पालिकेत मोठा अनागोंदी कारभार सुरू असून पालिकेतील नगराध्यक्ष व मुख्याधिकारी इतर नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत आहेत. पालिकेची अपुरी असलेली कामांची बिले काढली असून यात अग्नीशामक दुरूस्तीचा ठराव नामंजूर असताना व मी स्वता: या विभागाचा सभापती असताना मला व इतर सदस्यांना विचारात न घेता नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या कामाचे बिल काढले आहे.
कामाचे कोटेशन न बनवता तब्बल तीन लाख तीन हजाराचे बिल काढले असून हा मनमानी कारभार सुरू आहे. जनतेने निवडून दिलेले नगराध्यक्ष जनतेचा विश्वासघात करत आहेत तर मुख्याधिकारी नुसते बिले काढण्यापुरतेच पालिका कार्यालयात येताहेत. मात्र, इतर मंजुर करण्यात आलेल्या कामांचे व नागरिकांच्या मुलभूत समस्यांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करत असल्याचेही बनगर म्हणाले. हा मनमानी कारभार न थांबवल्यास जनआदोंलन उभा करण्याचा इशारा ही त्यांनी दिला आहे.
Post a Comment