सातारा-उंब्रजमध्ये महामार्ग रोखला


उंब्रज : 'आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे', 'एक मराठा लाख मराठा', अशा घोषणांनी मराठा बांधवांनी गुरूवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास परिसर दुमदुमून सोडला. यावेळी मराठा बांधवानी महामार्गावर ठिय्या मांडला तसेच सरकार विरोधी घोषणा देत काही काळ राष्ट्रीय महामार्ग रोखण्‍यात आला. दरम्यान, उंब्रज येथे महाराष्ट्र बंदच्या पार्श्र्वभूमीवर उंब्रजसह परिसरात कडकडीत बंद पाळला.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.जिल्ह्यातील ३ हजार बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

No comments

Powered by Blogger.