Your Own Digital Platform

हे काम १२ नोव्हेंबरपूर्वीच करा! ...अन्यथा, व्हॉट्सअॅप चॅट होईल डिलीट


मुंबई : सोशल मीडियावर वावरणाऱ्या तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हाट्सअॅप (WhatsApp)संबंधी एक महत्त्वाची बातमी आहे. व्हाट्सअॅप आपल्या बॅकअप पद्धतीत मोठा बदल करत आहे. आगोदर WhatsAppचा बॅकअप घ्यायचा असेल तर, गुगल ड्राईव्हची मदत घ्यावी लागत असे. पण, आता त्याची गरज नाही. व्हॉट्सअॅपचा नावा अपडेट चॅट बॅकअप घेण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे.

फेसबुक आणि गुगल यांच्यात नावा करार


व्हाट्सअॅपचे पालकत्व असलेली कंपनी फेसबुक आणि गुगल यांच्यात एक नावा करार झाला आहे. ज्याद्वारे वापरकर्ते व्हाट्सअॅप बॅकअप आपल्या पर्सनल अकाऊंटमधून अगदी मोफत घेऊ शकतात. व्हाट्सअॅप आणि गुगल यांच्यातील करारानुसार, येत्या १२ नोव्हेंबरपासून व्हाट्सअॅपचा बॅकअप गुगल क्लाऊड स्टोरेजसाटी स्पेस घेणार नाही. त्यानंतर व्हाट्सअॅप मीडिया, टेक्स्ट आणि मेमोसह प्रत्येक प्रकाराचा डेटा डूगल अकाऊंटवर अॅटोमेटीक बँकअपसाठी घेतला जाईल.

..तर डेटा संपूर्ण डिलीट होणार

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये व्हाट्सअॅप अपडेट होण्यासोबतच जुना डेटा, जो गेली वर्षभर अपडेट केला नाही तो संपूर्ण डिलिट होईल. यात फोटो, व्हिडिओ आणि चॅटचाही समावेश असेन. त्यामुळे १२ नोव्हेंबरपूर्वी आपण आपल्या व्हाट्सअॅपचा डेटा घेऊन ठेवला आहे का याची खात्री करा. घेतला नसेल तर आताच घ्या. नंतर तो डिलिट झाल्यास केवळ हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीच करता येणार नाही. दरम्यान, बॅकअप घेताना फोन वायफायने कनेक्ट करा, असा सल्ला कंपनीने वापरकर्त्यांना दिला आहे. कारण, बॅकअप फाईल्स साईजने वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यामुळे इंटरनेटचा खूप डेटा त्या घेतात. त्यामुळे असा डेटा घेताना तुम्हाला इंटरनेटसाठी एक्ट्रा डेटा लागू शकतो. तसेच, त्यासाठी चार्जही लागू शकतो.