Your Own Digital Platform

शिरवळमध्ये गोळीबार


शिरवळ :  शिरवळ येथील वाईन शॉप चालकावर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला. नेम चुकल्याने वॉईनशॉप चालक बचावला आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधीक्षक पंकज देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ येथील पळशी रोडवर एक वाईन शॉप आहे. वाईन शॉप चालक आकाश कबुले व कामगार हे शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास दुकान बंद करत असताना दुचाकीवरून दोन अज्ञात व्यक्ती तेथे आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने आकाश कबुलेच्या दिशेने गोळी झाडली.

यावेळी नेम चुकल्याने व गोळीच्या आवाजाने आकाश कबुले व कामगार सावध झाले. यावेळी गोळीबार करणारे दुचाकीवरून शिरवळ बाजूकडे पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक सुनील पवार, सागर अरगडे यांनी धाव घेतली. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या अधिकाजयांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून पुंगळी हस्तगत केली.