मुंजवडीचा युवक मांज्याचा दोरा लागुण जखमी


लोणंद : पुणे येथे सिव्हील हॉस्पीटलमधील आजारी असणाऱ्या पाहुण्यांना बघण्यासाठी मुंजवडी ता. फलटण येथील दत्तात्रय किसन आवळे ( वय ४४ ) व त्यांचा मुलगा विकी दत्तात्रय आवळे हे गेले होते. पाहुण्यांना भेटून आलेवर ते मोटरसायकलवरून फलटणच्या पुढील मुंजवडी गावाकडे निघाले होते, लोणंद ता. खंडाळा येथुन फलटणला मोटरसायकलवरुन जाताना दुपारी साडे तीन वाजणेच्या सुमारास लोणंद पोलीस स्टेशनच्या थोडे पुढे गेल्यावर केतकी ढाब्याच्या जवळचं गाडीवरुन जात असताना अचानक मांजाच्या धागा गळ्याला जोरदार घासल्याने प्लॅटीना मोटरसायकल चालवणारे दत्तात्रय किसन आवळे गंभीर जखमी झाले.

तात्काळ त्यांना सिद्धीविनायक हॉस्पीटल या ठीकाणी मुलाने मोटरसायकलवरून आनले, तात्काळ तेथील डॉ. नितीन सावंत यांनी रुग्णावर तातडीने उपचार केले, मांज्याचा धागा गळ्याला कापला गेल्याने गळ्याला आठ टाके पडले, प्रसंगी वेळीच ऊपचार डॉक्टरांच्या कडुन झाल्याने रुग्णाचे प्राण वाचले.

 सद्या पतंग ऊडवण्याची शर्यतच मुले लावत आहेत, आपल्या पतंगाच्या दोरीने दुसऱ्याची पतंग कशी लवकर तुटेल व आपण कशे विजयी होऊ याची स्पर्धा सर्रास सगळीकडे लागली आहे.पतंग कटवणेसाठी जास्तीत महागाचा दोरा घेतला जातो, तो दोरा नायलॉनचा असल्याने त्याला खळ, बारीक काचेच्या तुकड्याची भुकटी वापरली जाते त्यामुळे हा दोरा लवकर कट होत नाही, पुर्वी लोक सुती दोरे पतंगासाठी वापरत होते त्यावेळी दोरा लगेच कट होत होता, तसाचं दोरा आताही वापरणे योग्य होईल, कारण नायलॉनच्या या धाग्याने कापून अनेकांचे जीव गेलेले आहेत, पशुपक्षीही कापले जात आहेत, असा मiजाचा दोरा वापरण्यावर शासनाने बंदी आणावी- सचिन शेळके -नगरसेवक ) ( चौकट- गेल्याच वर्षी पतंगाचा मांज्याचा दोरा गळ्याला कापल्याने एका मुलाचा लोणंदमध्ये जीव गेलेला होता, पतंग आवश्य खेळा मात्र दोरा सुती वापरा, लोणंदमधील जे दुकानदार नायलॉन मांज्याचा खळ वापरुन काचेची भुकटीचा वापर केलेला दौरा विकत असतील त्या दुकानदारांच्यावर लोणंद नगरपरिषदेने बंदी आणावी ,ही बंदी वेळीच नगरपरिषदेने केली तर अशा घटणाऱ्या घटना थांबतील.
- साजीद शेख सतर्क नागरीक, लोणंद 

No comments

Powered by Blogger.