सज्जनगडाच्या तटावरून पडून युवकाचा मृत्यू


परळी : खुंटे (ता. फलटण ) येथील एक युवक सज्जनगडावर फिरायला आला होता. यावेळी गडावर पाठीमागे असलेल्या तटावर फोटो सेशन करत असताना पाय घसरून खोल दरीत पडला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खुंटे येथील अनिकेत बाळू ननावरे (वय, 18) हा युवक गजवडी येथे असलेल्या रोहिदास भंडारे, वामन भंडारे यांच्याकडे चार दिवसांपूर्वी आला होता. याच परिसरात त्याला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. तशी त्याची धावपळही सुरू होती.

 सलग दोन दिवस सुट्टी असल्याने शनिवारी सकाळी गडावरून फिरून येतो असे घरातल्यांना सांगून गेला. यावेळी त्‍याच्या सोबत कोणच नव्हते, समाधी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर तो गडाच्या पाठीमागे असलेल्या धाब्याच्या मारुती या ठिकाणी दुपारी दीडच्या सुमारास फोटो सेशनसाठी गेला होता. याच दरम्यान तेथील तटबंदी, रेलिंग येथून पायघसरून तो सुमारे दोनशे फूट खोल दरीत पडला. या घटनेची माहिती गडावर समजताच ग्रामस्थांनी तटाकडे धाव घेतली आणि घडलेली घटना पोलिस खात्याला कळवली.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अनिकेतचा दोनशे फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला.

No comments

Powered by Blogger.