संपूर्ण महाराष्ट्र बंद मात्र लोणंदची बाजारपेठ चालू एक नवा आदर्श व्यापारी व सर्वसामान्याकडून या निर्णयाचे स्वागत


लोणंद : सकल मराठा समाजातर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आलीय. मात्र या आंदोलनामध्ये लोणंद बंद न ठेवता ठिय्या आंदोलना करण्यात आले होते.

सकाळी ११ वाजता नगरपंचायत लोणंद येथे सुरु झालेले ठिय्या आंदोलन शांततेत सुरू झाले असून या आंदोलनाला लोणंद व लोणंद परिसरातील सर्वच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्षा स्नेहलता शेळके पाटील, उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, मराठा समाजाचे अध्यक्ष बाळासाहेब कदम ,नारसेविका स्वाती भंडलकर, हेमलता कर्नवर, कुसुम शिरतोडे, नगरसेवक हणमंतराव शेळके, सचिन शेळके,संजय क्षीरसागर, अॅड. बाळासाहेब बागवान, लोणंद नगरपंचायतीचे ।विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे, स्विकृत नगरसेवक सुभाषराव घाडगे, कॉग्रेसचे जिल्हा ऊपाध्यक्ष राहूल घाडगे, शिवाजीराव शेळके पाटील, माजी जि. प. सदस्य आनंदराव शेळके पाटील, डॉ. नितीन सावंत, सुरेश भोईटे, शंभुराजे भोसले, गोविंद पटेल, कय्यूम मुल्ला, संतोष मुसळे, रामेश शिंदे, नितीन शिंदे, गजेंद्र मुसळे, सुनिल यादव, उत्तमराव सावंत, संतोष सस्ते, राष्द्रवादी पक्षाचे सागर शेळके, आझम आतार, लोणंद फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक दयानंद खरात, सुनिल शहा, लोणंद, हिंगणगाव, बाळू पाटलाची वाडी, आरडगांव येथील सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते

No comments

Powered by Blogger.