राजुरी येथे एकाच दिवशी पती व पत्नी चे निधन


राजुरी : राजुरी माळवे वस्ती येथील जगन्नाथ बाळा बोंद्रे वय वर्षे 75 व पत्नी गजराबाई जगन्नाथ बोंद्रे वय वर्षे 70 यांचे एकाच दिवशी पती पत्नी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. 

सदर बोंद्रे कुटूंब माळवे वस्ती येथे राहत होते. दुपारी 12 वा. जगन्नाथ बोंद्रे यांचे निधन झाले. तर त्याच दिवशी रात्री 8 वा. त्यांची पत्नी गजराबाई माळवे यांचे निधन झाले. दोन्ही पती पत्नीचे वृद्धापकाळाने एकाच दिवशी निधन झाले. या निधनाची राजुरी परिसरात चर्चा झाली. 

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments

Powered by Blogger.