केरळ पुरग्रस्तांना युवा स्वयंरोजगार संस्थेची मदत


सातारा : केरळमध्ये आलेल्या महापुराने चारशे लोकांची जीवीतहानी तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर देशभरातून मदतीचे हात पुढे आलेले असताना सातारा जिल्ह्याने त्यामध्ये सहभाग घेतला आहे. 

साताऱ्यातील युवा स्वयंरोजगार संस्थेने मदतीचा हात पुढे करत संस्थेचे अध्यक्ष सचिन अवघडे यांच्यासह सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 5 हजार रूपयांचा धनादेश सोमवारी सोपविला. यावेळी संस्थेच्यावतीने कार्यरत असलेले सुरक्षारक्षक अंकुश गायकवाड, धनराज कांबळे, चंद्रकांत गायकवाड, जयसिंग साळुंखे, धनाजी शिंदे, रमेश जाधव, जयंत गायकवाड आदी.उपस्थित होते. दरम्यान, युवा स्वयंरोजगार संस्थेने केरळ पुरग्रस्तांप्रती दाखविलेली संवेदनशीलता व आत्मयितेचे कौतुक करत सातारा जिल्ह्यातील उद्योजकांनी देखील मदतीचा हात देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेही केले.

No comments

Powered by Blogger.