Your Own Digital Platform

न्यायालयाच्या आदेशानुसारच विसर्जनाचा निर्णय : जिल्हाधिकारी


सातारा : शहरातील गणेश विसजर्न करण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यांनी तात्काळ कार्यवाही केली पाहिजे. त्याबाबतच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या असून विसर्जन न्यायालयाच्या आदेशानुसारच करण्यात येईल, असे स्पष्ट मत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना भूमिका स्पष्ट केली. तसेच येत्या काही दिवसात हिल मॅरेथॉन साताऱ्यात होत असून मॅरेथॉनच्या निमित्ताने सातारा शहराचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. धावपटूंना त्रास होवू नये यासाठी पालिका व प्रशासनाने उपाययोजना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर मेडिकल कॉलेजच्या जागा हस्तांतरणाबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांशी चर्चा झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुढील प्रकिया पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.