आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा कराडात मोर्चा


कराड : धनगर समाजाला देण्यात आलेल्या एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज धनगर समाजच्यावतीने कराड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर नाक्यापासून मोर्चास सुरुवात झाली. येळकोट येळकोट जय मल्हार, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ढोल ताशांचा गजर पिवळ्या टोप्या आणि झेंडे घेऊन समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांचा सहभागही मोठा होता धनगरी नृत्याने मोर्चात रंगत आणली.

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे नाव देणे द्यावे, शासकीय गायरानातील भूखंड मिळावा, शेळ्या मेंढ्यांच्या व्यवसायासाठी युवकांना भरीव अनुदान देण्यात यावे, धनगर समाजाच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात वसतीगृह उभारावे, धनगर समाजाला एसटीच्या सवलती मिळाव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.