मारूती बुवा मठाच्या ट्रस्टी विरोधात बरखास्तीचा ठराव


कराड : येथील मारूती बुवा मठाच्या ट्रस्टीविरोधात वारकर्‍यांनी तीव्र भावना व्यक्त करत ट्रस्टींना बरखास्त करण्याचा ठराव मांडला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढण्याचाही ठराव यावेळी करण्यात आला. ट्रस्टींना मठात पाय ठेवू न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आज, रविवार (दि.५ ऑगस्ट) दुपारी मारूती बुवा मठात ३६ गावातील लोक, वारकरी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीला ट्रस्टीना बोलावूनही ट्रस्टी जाणीवपूर्वक गैरहजर राहिले आहेत. 

तर, हिशोबाबाबतही वारकर्‍यांना सविस्तर माहिती दिली जात नसून, जी माहिती दिली आहे, त्यात गैरव्यवहार असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. त्यामुळे ट्रस्टींना बरखास्त करण्याची मागणी करत मठाचे पैसे ज्या बँकेंत अथवा पतसंस्थेत आहेत, ती खाती न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत गोठवण्याची मागणीही यावेळी वारकऱ्याकडून करण्यात आली. या प्रकरणात ट्रस्टी न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने न्यायालयीन लढा लढावा लागणार असून त्याबाबतचे ठरावही यावेळी संमत करण्यात आले.

No comments

Powered by Blogger.