गुरव समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


सातारा : हिवाळी अधिवेशनात मुंबईतील कोळीवाड्याबरोबरच सर्व देवस्थानच्या जमिनी भोगवटा वर्ग 1 च्या करणार असे विधेयक मंजूर करण्यात आले होते. मात्र, त्याची पुढे कारवाई न झाल्याने संतप्त सातारा जिल्हा गुरव समाजाने गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असा शिंग फुकत मोर्चा काढून शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी नंदकुमार गुरव, महिला प्रतिनिधी सुरक्षा साखरे, अरविंद पाभरे, भालचंद्र गोडबोले, शिवाजीराव गुरव, विजर पोरे व गुरव समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनेक वर्षांपासून देवस्थान जमिनीचा महसूल विभागात भ्रष्ट कारभार कुळांची दडपशाही सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात जमिनी भोगवटा वर्ग 1 करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. गुरव समाजाच्या इनाम वर्ग तीनच्या जमिनीच्या इंडोमेन्ट ट्रस्टवर वारसांची नावे त्वरित लावण्यात यावीत, गावांनी देवस्थानची स्कीम करून पुजाऱ्यांनी मंदिरातून हकालपट्टी केली जाते. अशा संबंधित गावातील लोकांना धर्मादाय सहआयुक्तांनी सूचना कराव्यात. इनाम वर्ग तीन मधील जमिनीवर वहिवाटदारांची नावे त्वरित लावण्यात यावीत यासह आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.