आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

अमेरिकन पाहुण्यांचे आधुनिक तंत्रज्ञाचे धडे


वाई :  येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय, इंग्लिश लिटस्सी प्रोग्रॅम या योजनेअंर्तगत अमेरिकेतील वेस्ट मिनस्टर कॉलेज सॉल्ट लेक सिटी कम्युनिटी कॉलेज मधील सहा प्राध्यापक व 14 विद्यार्थ्यांनी आठ दिवस मार्गदर्शन केले.

प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सहावी व सातवीतील 250 विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून कृतीयुक्त अध्यापन पध्दतीने शिकवले. यशवंत शिक्षण संस्थेच्या गुळूंब, केंजळ, उडतरे व शिवथर या शाखांनाही या योजनेचा फायदा झाला. सुरूर येथील महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी अमेरिकेतील व्यावसाय मार्गदर्शन तज्ञ प्रा. जेनीफर क्‍लेंक यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव ऍड. अरविंद चव्हाण, संचालक ऍड. ललित चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र शिंदे, उपमुख्याध्यापक कृष्णा मोरे, परिवेक्षक सुनिल मोरे, यांनी स्वागत केले संतोष चौधरी यांनी सूत्रसंचालन केले.

साजिदा पटेल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कांता पाडवी यांनी आभार मानले, सतिश घाडगे. आकाश कांबळे सविता कोरडे, नयना शिंदे तुषार चव्हाण सुनिल ठोंबरे आणि रश्‍मी बागल भाषंतर मदत केली. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.