Your Own Digital Platform

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार


लोणंद : धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी झाली पाहीजे. या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने लोणंदमध्ये भव्य मोर्चा काढून खंडाळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी लोणंद येथील राजमाता अहिल्यादेवी स्मारक येथून आरक्षण मिळवण्यासाठी भव्य मोर्चास सुरूवात झाली.

प्रथम राजमाता अहिल्यादेवी यांच्या स्मारक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे - पाटील, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके- पाटील, कॉग्रेसचे ज्‍येष्ठ नेते अॅड. बाळासाहेब बागवान, उपसभापती वंदनाताई धायगुडे - पाटील, रमेश धायगुडे- पाटील, नगराध्यक्षा स्नेहलता शेळके- पाटील, लता ताई नरुटे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके, नगरसेवक हणमंतराव शेळके, सचिन शेळके, समता परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र नेवसे, विनोद क्षीरसागर, डॉ. नितीन सावंत,अॅड. सुभाष घाडगे, योगेश क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर, राजेंद्र डोइफोडे, अॅड. पी.बी . हिंगमिरे, हेमलता कर्नवर, स्वाती भंडलकर, बबनराव शेळके, अशोक धायगुडे उपस्थित होते.