Your Own Digital Platform

झिरपवाडी येथील प्राथमिक शाळेस पुस्तके भेट


फलटण : सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प (एच.आर.डी.पी.) व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे झिरपवाडी, ता.फलटण येथील प्राथमिक शाळेतील ग्रंथालयास 200 पुस्तके भेट देण्यात आली. 

यावेळी झिरपवाडीचे सरपंच महादेव गुंजवटे, प्रकल्प अधिकारी आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत झिरपवाडी येथे शेती, पशुधन, पिण्याच्या पाण्याची सोय, महिला बचतगट, शिक्षण, आरोग्य इत्यादी विषयांचे सखोल मार्गदर्शन करणे, विविध विषयांच्या शिबीरांचे आयोजन करुन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हा मुख्य उद्देश असल्याचे अफार्म चे प्रकल्प अधिकारी आनंदराव पाटील यांनी यावेळी सांगीतले. 

एच.डी.एफ.सी. बँक व एच.आर.डी.पी. यांच्या संयुक्त विद्यमाने झिरपवाडी हे गाव दत्तक घेतले असून गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. तसेच वरील संस्थांच्यावतीने राबविण्यात येणार्‍या सर्व योजनांचा ग्रामस्थांनी फायदा घ्यावा, असे आवाहन सरपंच महादेव गुंजवटे यांनी केले. 

कार्यक्रमास श्री. शेंडे, संतोष पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बनकर, सौ.धुमाळ, सौ.सस्ते, सौ.राऊत, श्री.मोरे, सौ.खुडे, सौ.गावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मोरे यांनी केले तर सौ.धुमाळ यांनी आभार मानले.