साताऱ्यात कडकडीत बंद


सातारा : मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा शहर तसेच तालुक्यांच्या ठिकाणी व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. शाळा-महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केली. एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शहर व परिसरात परिस्थितीची पाहणी केली. जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख हेही परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहेत.

सकल मराठा समाजच्यावतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे काढले. सरकारकडून मराठा समाजाची केवळ आश्‍वासनाने बोळवण केली. त्यामुळे मराठा समाजाने राज्यभर ठोक आंदोलन सुरू केले. त्याची दाहकता राज्याने अनुभवली. त्यानंतर क्रांती दिनी सकल मराठा समजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव आले होते. जिजाऊ वंदना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली.

मराठा आरक्षणासाठी पाळण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ठिकाणी व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांनी बाजारपेठा बंद ठेवल्या. शाळा-महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केली. एसटी डेपोतून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन ठप्प झाले.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात मराठ्यांकडून ठोक मोर्चे काढले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वच तालुक्यातील प्रमुख बाजार पेठ बंद होत्या. दुकानाना टाळे ठोकून अनेकजण यामध्ये सहभागी झाले होते.

बंद बरोबरच तहस[ल कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या बरोबरच जागरण गोंधळ, रॅली, व्याख्याने असे कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

No comments

Powered by Blogger.