श्री सेवागिरी विद्यालयाची तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेत बाजी


पुसेगाव : नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुसेगाव ता खटाव येथील रयत शिक्षण संस्थच्या श्री सेवागिरी विद्यालयाचा 14 वर्षे वयोगटातील संघाने नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंना विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एस. निर्मळ, क्रीडाशिक्षक पी. एम. झाटे आणि आर. एस. मोहिते तसेच मदने सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या स्पर्धेमध्ये मयूर पवार (कर्णधार), वेदांत क्षीरसागर (गोलकीपर), आर्यन शेडगे, संग्राम साळुंखे, आदित्य देशमुख, प्रणय ढेंबरे, ओम जाधव, विश्वजीत जाधव, हर्षवर्धन घाडगे, प्रणव धुमाळ, आदित्य जामदार, अथर्व चव्हाण, सोहमराज शिंदे, ओंकार फडतरे, भरत चव्हाण, प्रीतम देवकर, रोहित इंगळे या खेळाडूंचा समावेश होता. क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल विद्यालयाची स्कूल कमिटी, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यालयातील शिक्षक वृंद या सर्वांनी अभिनंदन केले.

No comments

Powered by Blogger.