लंगडे दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम


फलटण  : विवाह समारंभातील सत्काराच्या खर्चास फाटा देत ती रक्कम मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेस मदत देण्याचा अभिनव उपक्रम वैद्य व लंगडे यांच्या शुभ विवाहप्रसंगी राबविण्यात आला. हरणाई सूत गिरणीचे चेअरमन रणजित देशमुख यांच्याहस्ते संस्था चालक दादासाहेब चोरमले यांना हा मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वडूज (ता. खटाव) येथील सुयोग कैलास लंगडे व निकिता सुनिल वैद्य (लोहगाव, पुणे) यांचा शुभविवाह नुकताच वडूज येथे पार पडला. या विवाहप्रसंगी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार हार, तुरे देवून न करता सत्कारावर होणाऱ्या खर्चाची रक्‍कम फलटण तालुक्‍यातील ठाकूरकी येथील महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधिर विद्यालयास मदत म्हणून देण्यात आली. खटाव तालुक्‍यातील युवा नेते व हरणाई सुत गिरणीचे चेअरम रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते महात्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांना मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी फलटण पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, पत्रकार शेखर जाधव, सुभाष भांबुरे, धनंजय क्षीरसागर, किरण बोळे, युवराज पवार, शक्ती भोसले, परेश जाधव, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक विठ्ठल ठोंबरे, अरविंद सोनवलकर, नानासाहेब काळूखे, प्रदीप पवार आदींसह वडूज, फलटण व पुणे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत जयंत लंगडे यांनी केले. आभार शितल लंगडे यांनी मानले.

No comments

Powered by Blogger.