Your Own Digital Platform

राष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान मोलाचे : शेखर चरेगावकर


सातारा : अश्‍वमेघ ग्रंथालय व माने कुटूंबिय यांचेकडून देण्यात येणारा गौरव पुरस्कार हा साहित्यिकांना त्यांच्या लेखन प्रवासात बळ देणारा आहे. राष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान मोलाचे असते. या पुरस्काराने वाचन संस्कृती दृढ होण्यास बळ मिळेल. हे पुरस्कार साहित्य कर्तृत्वाचा गौरव करणारे आहेत असे गौरोद्गार राज्यमंत्री शेखर चरेगावकर यांनी काढले.

अश्‍वमेघ ग्रंथालयामार्फत कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम चरेगावकर यांच्या शुभ हस्ते व प्रा. श्रीधर साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थापक रविंद्र भारती-झुटिंग, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, अध्यक्ष शशिभूषण जाधव, केदार खैर उपस्थित होते. यावेळी उमा कुलकर्णी यांना संवादु – अनुवादु, नवनाथ गोरे यांना फेसाटी, सुप्रिया जाधव यांना कोषांतर तर संतोष वाटपाडे यांना ही बाग कोणाची आहे या ग्रंथासाठी अक्षर गौरव साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांसाठी देण्यात येणारा अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार डॉ. मानसी लाटकर यांना संत कबीर व प्राचार्य मा. के. यादव यांना कर्मवीर भाऊराव पाटील या ग्रंथासाठी देण्यात आला.

कु. रूपल पाटोळे हिला चांदण या कविता संग्रहासाठी अक्षर गौरव प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैदही कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. शशिभूषण जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गझलकार म. भा. चव्हाण, भूषण कटककर, कवियित्री स्वाती सामक, अरूण गोडबोले, बाळासाहेब बाबर, बाबूजी नाटेकर, विलास आंबेकर, बाबूराव शिंदे, डॉ. अजय देशमुख, प्रदीप कांबळे, अंजली कुलकर्णी, डॉ. सुहास पोळ, विरूपाक्ष कुलकर्णी, साहेबराव होळ, जगदीश पवार, अजित साळुंखे, पुरूषोत्तम शेठ, आदी मान्यवर उपस्थित होते.