मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन


कराड : कराडमधील (जि. सातारा) दत्त चौकात मराठा भगिनींनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात मंगळवारी कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज परिसरातील मराठा भगिनींसह बांधवांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी कराडमधील टाऊन हॉल ते दत्त चौक या दरम्यान रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

तसेच मराठा बांधवांनी दत्त चौकात मुंडन आंदोलनही केले.कराडमधील दत्त चौकात गेल्या सात दिवसांपासून भगिनींचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. साखळी पद्धतीने तालुक्याच्या विविध भागातील भगिनी आणि बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत. रॅलीवेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दत्त चौकात मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केले.

No comments

Powered by Blogger.