सदगुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेतील विद्यार्थीणींना मोफत शालेय गणवेशाचे वाटप


कोळकी : मुलांच्या आवडी निवडी नुसार त्यांना शिक्षण दयावे, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. असे प्रतिपादन ब्रिलियंट अकॅड्मिच्या प्रशासकीय संचालिका प्रियदर्शनी भोसले यांनी केले.

प्रियदर्शनी दत्तक मुली योजनेअंतर्गत श्री .सदगुरु हरीबुवा महाराज शिक्षण संस्थेतील विद्यार्थीना मोफत शालेय गणवेशाचे वाटप प्रसंगी सौ. भोसले बोलत होत्या. या प्रसंगी आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती फुले, श्रीमती शोभा पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

सौ. भोसले म्हणाल्या , गरीब परिस्थिती मुळे मुलींना योग्य शिक्षण घेताना अनेक समस्यांना तोंड दयावे लागते, पालकांनाही त्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहू शकतात . सामाजिक बांधिलकीच्या नात्याने गुणवंत व गरजू मुलींना शालेय साहित्य व गणवेश वाटपा बरोबरच वैद्यकीय तपासणी ,मुलींच्या साठी मार्गदर्शन वर्ग आदी आपण राबवणार आहोत.मुलींनी शालेय अभ्यासात चांगले गुण प्राप्त करावेत . माझ्या मुली म्हणून मी नेहमी त्यांच्या पाठीशी राहील ,अशी ग्वाही सौ. भोसले यांनी या प्रसंगी दिली.

गेले 3 वर्ष श्री सदगुरु शिक्षण संस्थेतील गरीब व गुणवंत अशा सुमारे 100 मुलींना प्रियदर्शनी भोसले यांनी दत्तक घेत आहेत त्यांचा इयत्ता 10 वी पर्यंतचा शैक्षणिक खर्च त्या स्वतः करत असतात या साठी त्यांना दिलीपसिंह भोसले , सौ .मधुबाला भोसले यांची मदत व मार्गदर्शन होत असते. 

सौ.मृणाल प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. सौ. रूपाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.