Your Own Digital Platform

जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी स्वता बनविलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्याचा संकल्प


कोळकी  : फडतरवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी स्वता बनविलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्याचा संकल्प केला.

रक्षाबंधन सणानिमित्त कार्यानुभव कार्यशाळेत टाकाऊ वस्तूं,मणी ,दोरा, रेशमी कापड आदी साहित्य मुलांनी व मुलींनी गोळा केले. मुख्याध्यापक शशिकांत नाईक, उपशिक्षिका छाया जाधव,धनश्री वारे,उपशिक्षक महादेव गायकवाड,नितीन कांबळे,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सुंदर राख्या बनविल्या .

या वर्षी नवीन राखी खरेदी न करता कार्यशाळेत बनविलेलीच राखी बांधण्याचा मुलींनी संकल्प केलाअसून हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.मुलींच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक शालेय व्यवस्थापन समितीचे अद्यक्ष ,पधादी कारी, ग्रामस्थांतून होत आहे.