जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार


घरात एकटी असलेल्या महिलेला जिवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात सुरेश जगन्नाथ चिकणे रा. कुसुंबी ता. जावली याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

जावली तालुक्‍यातील गावात महिला घरात एकटी बसली होती. घरात कोणी नसल्याचे पाहत संशयीत घरात गेला. त्यानंतर तू मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू खुप सुंदर आहे.

असे म्हणत त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र पिडीतेने त्यास विरोध केला. त्यावेळी आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर बदनामीच्या भितीने महिलेने तो प्रकार कोणालाच सांगितला नाही.

त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने वेळोवेळी सहा वेळा पिडीतेवर अत्याचार केला. आरोपीचा सततच्या त्रासाला वैतागुन अखेर महिलेने मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नि जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक झांजुर्णे हे करत आहे.

No comments

Powered by Blogger.