Your Own Digital Platform

राजुरी येथे बेंदुर सणा निमित्त आयोजित उत्कृष्ट बैल जोडी स्पर्धा संपन्न


राजुरी  : संकल्प फाऊंडेशन राजुरी यांच्या वतीने बेंदूर सणा निमित्त शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी व प्रोत्साहन मिळण्यासाठी उत्कृष्ट बैल जोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेस राजुरीतील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुंडलिक संपत धुमाळ( राजुरी चौफुला ) यांचा, द्वितीय क्रमांक मधुकर महादेव पवार ( भवानीनगर ) तृतीय क्रमांक रामचंद्र सर्जेराव गावडे - पाटील यांचा आला. या सगळ्यांना मानाचा फेटा, ढाल, शाल व श्रीफळ त्यांच्या घरी जाऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्तेजनार्थ बैल जोडीचे पारितोषिक मारुती पालवे ( रायदंडवाडी ) व विठ्ठल सीताराम खुरंगे - पाटील यांचा देण्यात आले. 

या स्पर्धेत अनेक शेतकऱ्यांच्या बैल जोडींनी सहभाग घेतला होता. या मध्ये आणखी चांगल्या असणाऱ्या बैल जोडी मालकांना त्यांच्या घरी जाऊन मानाचा फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब गावडे, कांतीलाल खुरंगे, डाॅ. बाळासाहेब सांगळे, संपत सांगळे, आबा गावडे, सतिश पवार, जयवंत पवार, गोरख रणदिवे, पै. शरद गावडे यांचा समावेश होता. 

या स्पर्धेसाठी राजुरी येथील हनुमान मंदिरा गावकरी मंडळी सालाबादप्रमाणे जमा होतात. यावेळी भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन डाॅ. बाळासाहेब सांगळे, राजुरी गावचे उपसरपंच पै. भारत गावडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल खुरंगे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सदस्य कांतीलाल खुरंगे, सोमनाथ गावडे, आनंद खुरंगे, बाळुपूरी गोसावी, मा. सोसायटीचे संचालक पोपटराव हगारे, माजी उपसरपंच बाळासाहेब हगारे, मच्छिंद्र सांगळे, राजुरी वन समितीचे अध्यक्ष विजय साळुंखे, अंकुश गावडे, युवा उद्योजक विनोद सांगळे , माजी सरपंच मोहन रणदिवे, संकल्प फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिल चव्हाण, उपाध्यक्ष सोमनाथ रणदिवे, खजिनदार संतोष काशिद, कार्याध्यक्ष गणेश बागाव, संपर्क प्रमुख पै. बिपीन बागाव, तेजस माळवे, अमोल लोंढे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजुरी शाखा अध्यक्ष प्रशांत रणदिवे, अविनाश रणदिवे, पै. नामदेव खटके, पै. दिनेश गावडे, सुखदेव रणदिवे, गणेश पवार, यांच्यासह राजुरी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनेे उपस्थित होते. पंच म्हणून सदाशिव गावडे - पाटील, संपत रणदिवे व जालिंदर पवार यांनी काम पाहिले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प फाऊंडेशन सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.