तडीपार मटकाकींग जब्बार पठाणला अटक


सातारा : तडीपार मटकाकींग जब्बार पठाण सातारा मध्यवर्ती बसस्थानाक परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, त्याची तडीपरीची कारवाई अवघ्या चार तासांनी संपणार असतानाच स्टँड चौकीतील पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. याबाबत अधिक माहिती अशी, जब्बार पठाणविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यासह विविध पोलिस ठाण्यात मटका, जुगारचे गुन्हे दाखल आहेत. यामुळेच त्याला गतवर्षी तडीपार करण्यात आले होते. 

तडीपारीची कारवाई असतानाही शुक्रवारी तो साताऱ्यात बिनधोकपणे फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांना मिळाली. स्टँडमधील पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस हवालदार दत्ता पवार, प्रवीण पवार यांनी सापळा लावला. जब्बार फिरत असतानाच त्याला ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात आणून त्याची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments

Powered by Blogger.