माण पंचायत समितीसमोर कर्मचाऱ्यांची निदर्शने


कुकुडवाड : राज्य सरकारी मध्यर्वती कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकरण्यात आलेल्या राज्यव्यापी संपात माण तालुक्‍यात पंचायत समिती व अंतर्गत कार्यालय, विभागातील विविध संघटनानी संपात सहभागी होत निर्दशने केली.

विविध कर्मचारी संघटणांच्या वतीने सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, कंत्राटीकरण बंद करावे, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य मागण्यांसाठी दि. 7, 8 व 9 दरम्यान संपाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत माण तालुक्‍यात शिक्षक संघटना, कृषी कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, पशुसंर्वधन संघटना, लेखा कर्मचारी संघटना, लिपीकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी सघटना, वाहन चालक सघटना, वर्ग – संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना यांच्यासह विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. मंगळवारी पंचायत समिती समोर निदर्शने करत जोरदार घोषणा देण्यात आला. दरम्यान, दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.

No comments

Powered by Blogger.